यावेळी तेथे युथ फॉर किनवट माहुरचे मार्गदर्शक महेश कोतपेल्लीवार , सुरज पाटील व इतर शिक्षकवृंद , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्रीनिवास येईलवाड , रोशन मस्के , प्रणय रत्नमानके , ऋतिक मस्के , ऋषिकेश चौधरी आदी उपस्थित होते.
कृषिदिनानिमित्त युथ फॉर किनवट माहुरमार्फत हा उपक्रम तालुक्यात बऱ्याच गावखेड्यांनी राबवण्यात आला..
तालुक्याला संपूर्णरित्या संपन्न करणे हाच युथ फॉर किनवट माहुरच्या निर्मितीमागचा मुळ उद्देश्य आहे असं यावेळी युथ फॉर किनवट माहुरच्या सदस्यांनी मते व्यक्त केलीत..
तालुक्यात बऱ्याच सामाजिक अडचणी दिसून पडतात पण याकडे प्रत्येकच व्यक्ती दुर्लक्ष करतोय.. अगदी निवडून दिलेले लोकप्रतिनिधिही सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष घालत नाही आहेत.. , आणि एकट्याने या अडचणींवर तोडगा काढणे शक्य होत नाही.. यामुळे युथ फॉर किनवट माहुरच्या रूपाने तालुक्यात सामान्य नगरिकांचे प्रश्न ,अडचणी सर्वांसमोर आणून त्याबाबत पाठपुरावा करून अडचणी सोडवून घेणारे संघटन उभे होत आहे याबाबत तेथे जमलेल्या सर्व गावकरी मंडळींनीही आनंद व्यक्त केला.
विशेष म्हणजे इतर कुठल्याही संघटना ह्या काहीतरी छुपा हेतु बाळगून मोठ्या केल्या जातात.. त्यांच्या कुणीतरी अध्यक्ष असतो आणि त्यांच्या हितासाठी संघटना प्रामुख्याने कार्य करत असते.
पण युथ फॉर किनवट माहुरमध्ये अध्यक्ष-उपाध्यक्ष ही पद्धतच नसून यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा येथे सदस्य(Volunteer) म्हणूनच संगळ्यांशी समान स्तरावर कार्यरत असतो आणि कायम हीच पद्धत संघटनेत राबवली जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केलेले आहे.
कदाचित याच कारणाने सरकारी कार्यालय , जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय कर्मचारीही युथ फॉर किनवट माहुरचे मोठ्या प्रमाणात समर्थन करताना आढळून येत आहे.