Social Media Tips : सोशल मीडियावर स्वत:ला सुरक्षित कसं ठेवाल? लक्षात ठेवा या 8 गोष्टी

 


सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपण जगभरातल्या अनेक गोष्टींशी कनेक्टेड राहतो; पण सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप्समुळे (Messaging Apps) आपलं आयुष्य जसजसं सोपं होत आहे, तशीच आपली प्रायव्हसी (Privacy) त्यामुळे कमी होत आहे. हॅकर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन मार्गांनी फसवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियाचा वापर करताना आपण सर्वतोपरी खबरदारी घेणं गरजेचं आहे. सोशल मीडियाचा वापर करताना सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर 8 उपाय सांगण्यात आले आहेत. या उपाययोजनांचा वापर केल्यास तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

1. पब्लिक सर्चमधून तुमचं प्रोफाइल ब्लॉक करा

फेसबुकसारख्या (Facebook) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला असा पर्याय उपलब्ध आहे. याद्वारे तुम्ही तुमचं प्रोफाइल सुरक्षित राखू शकता. यामुळे कोणतीही व्यक्ती तुमचं प्रोफाइल सर्च करू शकणार नाही.

2. वेळोवेळी लॉगआउट करा

फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि कू यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळी लॉगआउट (Log Out) करा. यामुळे हॅकिंगचा (Hacking) धोका कमी होतो. अनेक वेळा आपण आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स दुसऱ्याचा लॅपटॉप, फोन किंवा सार्वजनिक ठिकाणी सुरू करतो. त्यामुळे प्रत्येक वेळी लॉगआउट करणं नेहमीच सुरक्षित असतं.

3. सोशल मीडियाचे क्रेडेन्शियल्स शेअर करू नका

आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या पासवर्डसारखा गोपनीय तपशील शेअर करू नये. असं केल्यास आपलं अकाउंट धोक्यात येऊ शकतं.

4. अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका

सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या व्यक्ती आहेत, त्यामुळे प्रत्येकाची फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) स्वीकारू नका. काही जण फसवणुकीच्या उद्देशानं फेक अकाउंट तयार करतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून सावध राहणं आवश्यक आहे.

5. ऑफिस किंवा घराचा पत्ता शेअर करू नका

सोशल मीडियावर अनेकदा आपण पोस्ट किंवा फोटो शेअर करताना लोकेशनदेखील (Location) नमूद करतो. अशा परिस्थितीत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर तुमच्या घराचा किंवा ऑफिसचा पत्ता टाकू नये. यामुळे अनोळखी व्यक्ती तुम्हाला ट्रॅक करू शकणार नाही.

6. अनोळखी लिंकवर क्लिक करणं टाळा

तुम्हाला सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची आणि विचित्र दावे करणारी लिंक आली तर त्यावर क्लिक करणं टाळा. हॅकर्स अशा लिंक्स पाठवत असतात. त्यावर क्लिक केल्यास तुमचं अकाउंट हॅक होण्याचा धोका असतो.

7. प्रायव्हसी सेटिंगकडे लक्ष द्या

सोशल मीडियावर तुमचं प्रायव्हसी सेटिंग (Privacy Setting) शक्य तितकं रिस्ट्रिक्ट करा. विशेषतः प्रोफाइल अधिक सुरक्षित कसं राहील याकडे लक्ष ठेवा.

8. फोटो, स्टेटस शेअर करताना सावधानता बाळगा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो, स्टेटस शेअर करताना किंवा कमेंट करताना अधिकधिक सावधगिरी बाळगा. अन्यथा अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Translate

نموذج الاتصال

Youtube Channel Image
Mahitiwala - माहितीवाला गरज नसावी पण माहिती असावी
Subscribe